देवाची वैयक्तिकरित्या   ओळख करून   घ्यायला तुम्हांला वडेल ?


देवाची वैयक्तिकरित्या ओळख करून घ्यायला तुम्हांला आवडेल का? या सगळ्याचा माझ्याशी काय संबंध? आपण आजही येशू ख्रिस्ताशी वैयक्तिक नातेसंबंध ठेवू शकतो का?


येशूला अजूनही आपल्यामध्ये रस आहे का? ख्रिस्तासोबत वैयक्तिक नातेसंबंध असणे म्हणजे काय? आणि त्याचा आपल्या जीवनावर कोणत्या प्रकारे परिणाम घडतो? आणि अशा प्रकारचे समर्पण कसे काय करता येईल?

हे चांगले प्रश्न आहेत आणि येशूचे महत्त्व ज्याच्या लक्षात येते अशा व्यक्तीला ते पडणारे आहेत. येशूविषयी तुम्हांला असणा-या या आणि इतर प्रश्नांची उत्तरे मिळण्यास तुम्हांला मदत व्हावी म्हणून पुढे काही माहिती दिली आहे.

येशूचे पुनरुत्थान झाले असल्यामुळे, त्याचे अनुयायी मृत संस्थापकाचा आदर करीत नाहीत

त्याच्यासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे वैयक्तिक नातेसंबंध आहेत. येशू ख्रिस्त आजही जिवंत आहे, आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांची जीवने तो आजही आशीर्वादित करतो. शतकानुशतके लाखो, करोडो लोकांनी येशूची योग्यता ओळखली. जगावर ज्यांचा मोठा प्रभाव होता अशा लोकांचाही यात समावेश आहे. लोकांना येशूची किती गरज आहे याविषयी बोलताना फ्रेंच शरीरशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ ब्लेज पास्कल यांनी म्हटले, "प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात देवाच्या आकाराची एक पोकळी आहे. केवळ देवच ती त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे भरू शकतो."

   तुम्हांला येशूला वैयक्तिकरित्या जाणून घ्यायला आवडेल का?

तुम्ही त्याला जाणू शकता. देवाची तुमच्यावर प्रीती असल्यामुळे, आवश्यक ती सर्व व्यवस्था देवाने अगोदरच करून ठेवलेली आहे. येशूचा मृत्यू आणि पुनरुत्थान यांद्वारे तुम्ही वैयक्तिक नातेसंबंधाचा आनंद घेऊ शकता. आपल्याला देवापासून विभक्त करणारी दरी येशूने सांधली आहे. येशूला वैयक्तिकरित्या कसे जाणून घ्यावे आणि त्याने अभिवचन दिलेल्या विपुल जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे समजण्यासाठी तुम्हांला पुढील चार नियमांची किंवा तत्त्वांची मदत होईल

   नियम क्र.1   देव तुमच्यावर प्रीती करतो आणि तुम्ही त्याला वैयक्तिकरित्या ओळखावे म्हणून त्याने तुम्हांला निर्माण केले.

योहान.3:6 "देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."

योहान.17:3 "सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे."

देवाला वैयक्तिकरित्या ओळखण्यापासून आपल्याला काय रोखून धरते?


नियम क्र.2   मनुष्य पापी आहे,

   आणि देवापासून विभक्त झालेला आहे, त्यामुळे आपण त्याला वैयक्तिकरित्या ओळखू शकत नाही किंवा त्याच्या प्रीतीचा अनुभव घेऊ शकत नाही.

रोम.3:23 "कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत."

रोम.6:23 "कारण पापाचे वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे."

marathi1


रोम.8:6-8 "कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण, पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे, कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे; ते देवाच्या नियमशास्त्राच्या अधीन नाही, आणि त्याला तसे होत येत नाही. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही."

एक मोठी दरी माणसाला देवापासून विभक्त करते. चांगले जीवन जगणे, तत्त्वज्ञान, किंवा धर्म यांसारख्या मानवी प्रयत्नांनी मनुष्य देवाशी वैयक्तिक नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा सतत प्रयत्न करीत आहे. पण त्यात तो नेहमीच अपयशी होतो.

ही दरी सांधण्याचा एकमेव मार्ग काय आहे हे तिसरा नियम स्पष्ट करतो.


नियम क्र.3   मनुष्याच्या पापासाठी येशू ख्रिस्त हाच एकमेव उपाय देवाने दिलेला आहे.

   केवळ त्याच्या एकट्याच्या द्वारेच आपण देवाला वैयक्तिकरित्या ओळखू शकतो आणि त्याच्या प्रीतीचा अनुभव घेऊ शकतो.

रोम.5:8 "परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला."

1 करिंथ.15:3-6 "...ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला, तो पुरला गेला, शास्त्राप्रमाणे तिस-या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले, आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला. त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला."

योहान.14:6 "येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही."

marathi2

 

आमच्या पापांची किंमत भरण्यासाठी, देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला आमच्याऐवजी वधस्तंभावर मरण्यास पाठवले व त्याला आमच्यापासून विभक्त करणारी दरी सांधली.

पण ही सत्ये केवळ माहीत असणे पुरेसे नाही...


नियम क्र.4   येशू ख्रिस्ताला आपण आपला वैयक्तिक तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारले पाहिजे, म्हणजे आपण त्याला वैयक्तिकरित्या ओळखू शकू व त्याच्या प्रीतीचा अनुभव घेऊ शकू.

योहान.1:12 "जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणा-यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला."

इफिस.2:8-9 "कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाहे असे नाही, तर हे देवाचे दान आहे, कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही."

ख्रिस्ताचा स्वीकार करणे यामध्ये स्वतःपासून देवाकडे वळणे (पश्चात्तापाचा आत्मा) आणि आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी व त्याच्या इच्छेप्रमाणे आम्हांला बनवण्यासाठी येशूने आमच्या जीवनात यावे असा विश्वास धरणे यांचा समावेश होतो. येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि आमच्या पापांसाठी तो वधस्तंभावर मरण पावला असा बौद्धिकरित्या विश्वास ठेवणे पुरेसे नाही. तसेच केवळ भावनिक अनुभव असणेही पुरेसे नाही. आपल्या स्वतःच्या इच्छेने आपण विश्वासाने येशूचा स्वीकार करतो.

   ही दोन वर्तुळे दोन प्रकारची जीवन दर्शवितात :

marathi3
अहं - अहं द्वारा नियंत्रित जीवन
अहं अथवा सीमित में अधीन
अहं द्वारा नियंत्रित रुचियाँ जो कलह व निराशा उत्पन्न करती है
यीशु जीवन के बाहर।
marathi4
यीशु-यीशु द्वारा नियंत्रित जीवन
जीवन के सिंहासन पर यीशु
अहं यीशु के अधीन है
असीम परमेश्वर द्वारा नियंत्रित रुचियाँ जिनके परिणाम स्वरूप परमेश्वर की योजना के साथ सामंजस्य।

   यांपैकी कोणते वर्तुळ तुमच्या जीवनाचे यथायोग्य चित्रण करते?

   कोणते वर्तुळ तुमच्या जीवनाचे दर्शक असावे असे तुम्हांला वाटते?

तुमच्या जीवनात येण्याच्या आमंत्रणाची वाट येशू ख्रिस्त पाहत आहे. तो म्हणतो, "पाहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवीन, आणि तो माझ्याबरोबर जेवील'' (प्रकटी.3:20).

ख्रिस्त तुमच्या अंतःकरणाच्या दरवाजावर ठोठावत असल्याची जाणीव कदाचित तुम्हांला होत असे. आता या क्षणी तुम्ही त्याला आत येण्याचे आमंत्रण विश्वासाने देऊ शकता. देवाला तुमचे अंतःकरण माहीत आहे, त्यामुळे कोणते शब्द वापरावेत याची चिंता करू नका. पुढे एक प्रार्थना सुचवली आहे :

प्रभू येशू, मला तुला वैयक्तिकरित्या जाणून घ्यायचे आहे. माझ्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. तू माझा तारक व प्रभू म्हणून माझ्या जीवनात यावेस म्हणून मी माझ्या जीवनाचे दार उघडून तुला आमंत्रण देतो. माझ्या जीवनाचा ताबा घे. माझ्या पापांची क्षमा केल्याबद्दल आणि मला सार्वकालिक जीवन दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. मी जशा प्रकारची व्यक्ती व्हावे असे तुला वाटते, तसे तू मला बनव.

जर ही प्रार्थना तुमची इच्छा व्यक्त करीत असेल, तर आताच ती करा आणि येशू ख्रिस्त त्याने अभिवचन दिल्याप्रमाणे तुमच्या जीवनात येईल. एकदा तुम्ही येशू ख्रिस्ताला तुमच्या जीवनात येण्याचे आमंत्रण दिले की, तुम्हांली कधीही न सोडण्याचे अभिवचन तो देतो.

इब्री.13:5 "त्याने स्वतः म्हटले आहे, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही."

देवाला वैयक्तिकरित्या जाणून घेणे हा तुमच्या जीवनाती सर्वांत मोठा निर्णय असेल.

   येशू ख्रिस्ताने तुमच्या जीवनात यावे अशी विनंती तुम्ही आता त्याला केली का?


 

ADDItional

Assistance